त्रिपाद नक्षत्र शांती / पंचक नक्षत्र शांती
त्रिपाद नक्षत्रे : कृत्तिका, पुनर्वसु, उत्तरा फाल्गुनी, विशाखा, उत्तराषाढा व पूर्वाभाद्रपदा या नक्षत्रांना त्रिपाद नक्षत्रे म्हणतात.
पंचक नक्षत्रे : धनिष्ठाचा उत्तरार्ध (३ व ४ चरण), शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा व रेवती या नक्षत्रांना पंचक नक्षत्रे म्हणतात.
व्यक्तीच्या मृत्यूसमयी त्रिपाद किंवा पंचक नक्षत्र असेल तर निकटच्या अनुक्रमे तीन किंवा पाच नातेवाईकांचे मृत्यू होतात असा समज आहे. या संकट निवारणासाठी दाह देताना पुत्तलविधी करावा. पुत्तलविधीमधे पिठाचे ३ किंवा ५ पुतळे करुन त्यांच्यासहित शवाचे दहन करतात.
सुतक संपल्यावर म्हणजेच ११ व्या दिवशी त्रिपाद नक्षत्र / पंचक नक्षत्र शांती करावी. ११ व्या दिवशी न जमल्यास १३ व्या दिवशी करावी.