Kelkar Guruji

केळकर गुरुजींबद्दल

श्री. श्रीकांत माधव केळकर यांचे शालेय शिक्षण पार्ले टिळक विद्यालय, विलेपार्ले, मुंबई येथून झाले.  पूर्वीच्या पार्ले महाविद्यालयातून (आताचे साठ्ये महाविद्यालय) विज्ञान विषयांसह १२ वी उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी माटुंगा, मुंबई येथील  विक्टोरिया ज्युबिली तांत्रिक संस्थेतून (आताची वीर जिजामाता तांत्रिक संस्था) 'कापड अभियंता पदविका' अभ्यासक्रम पूर्ण केला.  नंतर त्यांनी माटुंगा, मुंबई येथील वेलिंगकर संस्थेतून 'व्यवस्थापन पदविका' प्राप्त केली.   ते मुंबई विद्यापीठाचे मानसशास्त्र विषयाचे पदवीधर आहेत. शिक्षण पूर्ण केल्यावर, सुमारे १५ वर्षे कापड व्यवसायाशी संबंधित कारखान्यांतून / आस्थापनांतून त्यांनी निरनिराळ्या अधिकारपदांवर नोकरी केली.

अनेक वर्षे निरनिराळ्या गुरुंकडून त्यांनी याज्ञिकी, ऋग्वेद संहिताज्योतिषशास्त्र अभ्यास पूर्ण करुन विद्या संपादन केली आहे.  प्रवास, वन्यजीव प्रकाशचित्रण, एक्युप्रेशर , योगसाधना, संगीत ऐकणे, वाचन, समाजकार्य, इ. गोष्टीत गुरुजींना रस आहे.

 

वेदमूर्ती श्री.श्रीकांत माधव केळकर (गुरुजी) यांनी इ.स. २००० नंतर पूर्णवेळ व स्वतंत्रपणे 'पौरोहित्य' सेवा पुरवण्यास सुरुवात केली.  गेल्या २० पेक्षा जास्त वर्षात त्यांनी निरनिराळ्या यजमानांसाठी अनेक विधी / संस्कार उत्तम पौरोहित्य सेवा देऊन, पूर्णपणे समाधानकारकरीत्या पार पाडले आहेत.  परदेशातही...

अधिक वाचा

आमच्या सेवा

पूजा

अनादी, अनंत व निर्गुण निराकार असे ईश्वराचे वर्णन करणा-या प्राचीन वैदिक परंपरेतच मूर्तिपूजेचा समावेश असणे परस्परविरोधी वाटते परंतु ईश्वराचे खरे स्वरूप...

अधिक वाचा

उपनयन

संस्कृतमधे 'उप + नी' या धातूचा अर्थ जवळ नेणे असा होतो, म्हणजेच विद्याभ्यासासाठी गुरुच्या सान्निध्यात नेणे.  विद्यागुरूच्या जवळ जाण्याचा हा संस्कार आहे...

अधिक वाचा

समावर्तन

'समावर्तन' (सम् + आ +  वृत्) म्हणजेच विद्यार्जन संपवून स्वगृही परत येणे.  म्हणजेच ब्रह्मचर्यव्रताची निवृत्ती होय.  पूर्वीच्या काळी वेदाध्ययन पूर्ण...

अधिक वाचा

विवाह

विवाहातील  विधींची उपयुक्त  माहिती कन्या वरयते रूपं माता वित्तं पिता श्रुतं | बान्धवाः कुलमिच्छन्ति मिष्टान्नमितरेजनाः  || ( मुलगी मुलाच्या रूपाकडे...

अधिक वाचा

शुभ शांती

वास्तुशांती वास्तू ह्या शब्दाची व्युत्पत्ती 'वस् = राहणे' या धातूपासून झालेली आहे.  'वास्तू' म्हणजे 'निवासस्थान' असा सर्वसामान्य अर्थ होतो. वास्तुनिर्मिती...

अधिक वाचा

जनन शांती

जननशांती म्हणजे दूषित काळात जन्मलेल्या तसेच जन्मत: शरीराकृतीमध्ये दोष असलेल्या बालकाची शांती.  जन्म झाल्यावर लवकरात लवकर बाराव्या दिवशी जननशांती करावी. ...

अधिक वाचा

त्रिपाद नक्षत्र शांती / पंचक नक्षत्र शांती

त्रिपाद नक्षत्रे : कृत्तिका, पुनर्वसु, उत्तरा फाल्गुनी, विशाखा, उत्तराषाढा व पूर्वाभाद्रपदा या नक्षत्रांना त्रिपाद नक्षत्रे म्हणतात. पंचक नक्षत्रे : धनिष्ठाचा...

अधिक वाचा

निधन शांती

व्यक्तीच्या मृत्यूमुळे निर्माण झालेले अरिष्ट दूर करण्यासाठी ही निधन शांती करतात.  ही शांती शुद्धीसाठी आहे.  या शांतीमधे  वरुण आणि मृत्युंजय देवता...

अधिक वाचा

यज्ञ

प्रत्येक व्यक्ती आपले जीवन व्यतीत करत असताना निरनिराळ्या संकटांना / अडथळय़ांना सामोरी जात असते.  कधी ही संकटे / अडथळे प्रासंगिक असतात तर कधी दीर्घकालीन. परीक्षेत...

अधिक वाचा

व्रत उद्यापन

एखाद्या व्यक्तीने एखादा विधी एका ठराविक काळापर्यंत केला असता त्याला 'व्रत' असे म्हटले जाते.  ते करत असताना काही यम / नियम अथवा बंधने पाळणे आवश्यक असते. ...

अधिक वाचा

जप / अनुष्ठान

काही संकटे किंवा अडथळे यांच्यावर मात करण्यासाठी किंवा त्यापासून अंशत: मुक्त होण्यासाठी जपानुष्ठान केले जाते.  जप हा कोणत्याही सिद्ध मंत्राचा, एका विशिष्ट...

अधिक वाचा

श्राद्ध

"श्रद्धया क्रियते यत्  तत् श्राद्धम् II" ही श्राद्धाची सर्वात सुटसुटीत व्याख्या आहे.  श्रद्धेने जे जे केले जाते त्यास श्राद्ध असे म्हणावे.  स्नेहाचे...

अधिक वाचा

षोडश संस्कार

                                                                 गर्भाधानो पुंसवनस्सीमन्तो वैष्णवोबलिः I  जातकं नाम निष्क्रामोऽन्नप्राशनं...

अधिक वाचा

शांतिकर्म

कोणत्याही शांतिकर्माची दोन प्रकारे विभागणी करता येईल - शुभ शांती व अशुभ शांती शुभ शांती : शुभता प्राप्त व्हावी म्हणून केले जाणारे शांतीकर्म. उदा : वास्तु...

अधिक वाचा

घोषणा

लग्नसराई

विवाह, मुंज, वास्तूशांती, उदकशांती, लघुरुद्र, पूजा किंवा इतर कोणतेही विधी फेसटाईम / स्काईप द्वारे सुलभपणे करु शकता.

भारताबाहेर

विवाह, मुंज किंवा अन्य कोणताही धार्मिक विधी, भारताबाहेर कुठेही वैदिक पद्धतीने संपन्न करण्यात येईल. कृपया संपर्क करा.

व्यक्तिगत ई - शिकवणी

फेसटाईम / स्काईप च्या माध्यमातून कोणतेही ऋग्वेद संहिता मंत्र / संस्कृत सूक्त / भगवद्गीता शास्त्रोक्त पद्धतीने म्हणायला शिका