जप / अनुष्ठान
काही संकटे किंवा अडथळे यांच्यावर मात करण्यासाठी किंवा त्यापासून अंशत: मुक्त होण्यासाठी जपानुष्ठान केले जाते. जप हा कोणत्याही सिद्ध मंत्राचा, एका विशिष्ट संख्येने केला असता त्याचे उत्तम फळ प्राप्त होते.
मकारो मननं प्राह त्रकारस्त्राणमुच्यते I मननत्राणसंयुक्तो मंत्रइत्यभिधीयते II अशी जामदग्न्य धनुर्वेदामधे मंत्राची व्याख्या केलेली आहे. एखाद्या विशिष्ट मंत्राचा जप / पुरश्चरण व्यक्तीने स्वत: करणे हे केव्हाही उत्तमच. परंतु कार्यबाहुल्यामुळे किंवा वेळेअभावी ते जर जमत नसेल तर शास्त्रशुद्ध उच्चारांसहित एखाद्या तज्ञ गुरुजींकडूनही ते करवता येते.
मंत्रांचे मुख्यत: बीजमंत्र, मूलमंत्र (वेदमंत्र, अक्षरसंख्याकमंत्र, नाममंत्र), मालामंत्र व संकीर्णमंत्र असे चार प्रकार आहेत.
वानगीदाखल काही मंत्र व त्यांची जपसंख्या पुढीलप्रमाणे :
- गणेश मंत्र : ॐ गं गणपतये नमः I (जपसंख्या २१,०००)
- नवार्ण मंत्र : ॐ ऎं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे I (जपसंख्या १,००,०००)
- नवग्रह मंत्र : प्रत्येक ग्रहासाठी स्वतंत्र मंत्र आहे (जपसंख्या : सूर्य - ७,००० / चंद्र - ११,००० / मंगळ - १०,००० / बुध - ४,००० / गुरु - १९,००० / शुक्र - १६,००० / शन - २३,००० / राहू - १८,००० / केतू - १७,०००)
- महामृत्युंजय मंत्र : ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं ० (जप संख्या १,२५,०००)
- विवाहयोग मंत्र : पत्नीं मनोरमां देहि (जपसंख्या १६,०००)
- रुद्रसूक्त : याची ११ / १२१ (लघुरुद्र) / १,३३१ (महारुद्र) आवर्तने करावीत.
- गणपती अथर्वशीर्ष : याची १,००० आवर्तने करावीत.
- श्री व्यंकटेशस्तोत्र : याचे १,००० पाठ करावेत.
- विष्णुसहस्रनाम : याचे १,१०० पाठ करावेत.
- दुर्गा सप्तशती : याचे १० /१०० / १,००० पाठ करावेत.
- हनुमानचालीसा : याचे १,००८ पाठ करावेत.