Vastu Peeth Mandal, Arrangement of Vastu Peeth Deities,

शुभ शांती

वास्तुशांती

वास्तू ह्या शब्दाची व्युत्पत्ती 'वस् = राहणे' या धातूपासून झालेली आहे.  'वास्तू' म्हणजे 'निवासस्थान' असा सर्वसामान्य अर्थ होतो.

वास्तुनिर्मिती होताना तेथे वावरणा-या व्यक्तींकडून कळत नकळत अनेक प्रमाद घडत असतात.  तसेच अनेकांच्या मनोविकारांस अनुसरून अनेकविध कृती घडतात.  कोणत्याही वस्तूच्या (वा जीवाच्या) निर्मितीची प्रक्रिया चालू असताना त्यावेळी होणा-या संस्कारांना महत्व असते.  वास्तुनिर्मिती होताना त्या घरातील पृथ्वीतत्त्वावर घडणारे सूक्ष्म कुसंस्कार नाहीसे करण्यासाठी  म्हणजेच वास्तूच्या प्रदूषणामुळे उद्भवणा-या उपद्रवांचे शमन होण्यासाठी वास्तुशांती करतात.


 

उदकशांती

उदक आणि शांती या दोन पदांपासून 'उदकशांती' शब्द बनलेला आहे.  'उदक' म्हणजे पाणी व 'शांती' म्हणजे उपद्रवांचे शमन. 

पंचमहाभूतांच्या संयोगाने ही सृष्टी बनलेली आहे.  आकाश व अग्नी स्वत: कधीच प्रदूषित होत नाहीत.  वायू स्वत: प्रदूषित होतो पण त्याचे प्रदूषण ही वैयक्तिक बाब नसून ती सामाजिक पातळीवरील बाब आहे.  उरलेली दोन तत्त्वे म्हणजे पृथ्वीतत्त्व आणि जलतत्त्व.  घरामधे वास्तुरूपाने पृथ्वीचे अस्तित्त्व असते तर घरात वापरात येणा-या पाण्याच्या रूपाने जलतत्त्वाचे अस्तित्त्व असते.  स्थूल स्तरावर पृथ्वी व जल या तत्त्वांचे अनुक्रमे वास्तू व पाणी या रूपांनी प्रदूषण होते तेव्हा ते आपल्या नजरेस येते.  परंतु सूक्ष्म स्तरावर जल प्रदूषित झाल्यास घरातील व्यक्तींचे प्रकृतिस्वास्थ्य बिघडते किंवा मन विकारवश होते.  यावरुन जलाच्या प्रदूषणामुळे उद्भवणा-या उपद्रवांचे शमन होण्यासाठी उदकशांती करावी असा अर्थ निष्पन्न होतो.  


 

वयोSवस्थाभिध शांती

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात बाल्य, तारुण्य व वार्धक्य अशा तीन अवस्था असतात.  वयाच्या २५ व्या वर्षांपर्यंत बाल्य, ५० व्या वर्षांपर्यंत तारुण्य व पुढील आयुष्य सर्वसामान्यपणे वार्धक्याचे मानले जाते.  मानवी आयुष्य सामान्यपणे १०० वर्षांचे कल्पून बरोबर अर्धे आयुष्य संपत येताच, ५० व्या वर्षापासून १०० व्या वर्षांपर्यंत दर ५ वर्षांनी एकून ११ शांती सांगितल्या आहेत.

या शांती पुढीलप्रमाणे आहेत.

५० व्या वर्षी वैष्णवी शांती, ५५ व्या वर्षी  वारुणी शांती, ६० व्या वर्षी  उग्ररथ शांती, ६५ व्या वर्षी  मृत्युंजय महारथी शांती, ७० व्या वर्षी भैमरथी शांती, ७५ व्या वर्षी  ऐन्द्री शांती, ८० व्या वर्षी  सहस्रचंद्रदर्शन शांती, ८५ व्या वर्षी  रौद्री शांती, ९० व्या वर्षी   कालस्वरूप - सौरी शांती, ९५ व्या वर्षी  त्र्यंबक - मृत्युंजय शांती, १०० व्या वर्षी  महामृत्युंजय शांती, इ. 

वयोमानानुसार विविध इंद्रियांना येणारी शिथिलता, वियोग, दु:ख, इ. अपवाद वगळता, सर्वसामान्यांना अटळ असते.  या शांती केल्यामुळे उपनिर्दिष्ट गोष्टी टळतात असे नाही.  परंतु वियोगामुळे होणारे दु:ख, शोक, मोह इत्यादी मोक्षप्रतिबंधक अडथळे दूर व्हावेत हा या शांतिकर्मांचा मुख्य हेतू असतो.

इतर शांती 

विनायक शांती, बृहस्पती शांती, वगैरे.

 

संपर्क करा




सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ