ऑनलाईन वास्तूशांती
अगदी काही वर्षांपूर्वीच, कोणत्याही सामान्य भारतीय माणसाला दूरध्वनीद्वारे, भारतातच पण थोड्या दूर अंतरावर राहणा-या त्याच्या अगदी जवळच्या नातेवाईकाशीसुद्धा दूरध्वनीद्वारे बोलणे कठीण व खर्चिक होते. परंतु, गेल्या काही वर्षातच झालेल्या तंत्रज्ञानातील विकासामुळे, आता तोच सामान्य माणूस जगात कुठेही राहणा-या, कोणाशीही, कोणत्याही वेळी संवाद साधू शकतो.
महाजाला (Internet) मुळे अगदी नाममात्र खर्चात, कोणत्याही दोन व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात राहू शकतात. अशा रीतीने, दोन व्यक्ती फक्त एकमेकाशी नुसत्या बोलतच नाहीत तर एकमेकांना पाहूही शकतात. दिवसेंदिवस जग जवळ येत चालले आहे. गेल्या काही वर्षात, हजारो हिंदू कुटुंबे अमेरिका, इंग्लंड आणि जगातील इतर महत्वाच्या व पुढारलेल्या देशांमधे कायमची / तात्पुरती स्थलांतरित झालेली आहेत. परदेशात नोकरी / धंदा करत असताना, जवळ जवळ सर्वच हिंदू कुटुंबे त्यांची स्वत:ची संस्कृती जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे.
या माध्यमाद्वारे, "ऑन-लाईन पौरोहित्य सेवा" उपलब्ध करून देताना मला अतिशय आनंद होत आहे. या सोयीद्वारे, जगातील कोणत्याही देशातील कोणतीही व्यक्ती, घरबसल्या कोणतीही पूजा, शांती, श्राद्ध असा कोणताही विधी करु शकते व त्यांच्या अंतर्मनातील इच्छा पूर्ण झाल्यामुळे समाधानी होऊ शकते. ही सेवा आपल्या सोयीच्या वेळेनुसार, वर्षाचे ३६५ दिवस उपलब्ध आहे.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, सिंगापूर व इतरही अनेक देशांतील यजमानांसाठी निरनिराळ्या शांती, पूजा, लघुरुद्र, सहस्रावर्तने यासारखे अनेक विधी उत्तम रीतीने संपन्न केलेले आहेत. फेसटाइम / स्काईपच्या माध्यमातून खालील सर्व विधी उत्कृष्टपणे करता येऊ शकतात.
- कोणतीही पूजा (गणेश पूजा, सत्यनारायण पूजा, सत्यविनायक पूजा, अनंत पूजा, लक्ष्मीपूजन, भूमिपूजन, मंगळागौर पूजा, गौरी पूजन, वगैरे)
- लघुरुद्र (रुद्रसूक्ताची १२१ आवर्तने)
- गणपती सहस्रावर्तने (गणपती अथर्वशीर्षाची १००० आवर्तने)
- वास्तूशांती, उदकशांती, गणहोम, गणेशयाग, देवीहोम, वगैरे
- कोणतीही जनन शांती (निरनिराळ्या ३० पेक्षा जास्त)
- मरणोत्तर शांती (त्रिपादनक्षत्र शांती, पंचकनक्षत्र शांती, निधनशांती)
- वयोवस्थाभिधशांती (साठीशांत, सहस्रचंद्रदर्शन, इ. (५० व्या वर्षापासून १०० व्या वर्षापर्यंत एकूण ११ शांती)
- षोडश संस्कार (सर्व १६ संस्कार)
- साखरपुडा / वाड्निश्चय व सीमांतपूजन
- देवदेवक व ग्रहमख (विवाह किंवा मुंजीच्या आधी)
- मुंज
- समावर्तन (सोडमुंज)
- विवाह
- कुंभविवाह / अर्कविवाह
- कोणतेही श्राद्ध
- कोणतेही व्रतउद्यापन
- सप्तशतीपाठ
- जप / अनुष्ठान
- वर नमूद न केलेला कोणताही हिंदू धार्मिक विधी
तयारी
संपूर्ण सामानाची यादी पाठवण्यात येईल. उपलब्धतेनुसार यादीतील शक्य असलेल्या वस्तू आपण आणाव्या. संबंधित शांती किंवा विधीसाठी आवश्यक ती सर्व माहिती देण्यात येईल. या सर्व मदतीच्या साहाय्याने आपण कार्य उत्तमपणे पार पाडू शकतो.