Grahanyog Janan Shanti, Inauspicious Shanti,

जनन शांती

जननशांती म्हणजे दूषित काळात जन्मलेल्या तसेच जन्मत: शरीराकृतीमध्ये दोष असलेल्या बालकाची शांती.  जन्म झाल्यावर लवकरात लवकर बाराव्या दिवशी जननशांती करावी.  त्या दिवशी योग्य नक्षत्र, अग्नी इत्यादी संबंधी मुहूर्त पाहण्याची जरूरी नसते.  त्यानंतर एरवी कधीही शांती करण्यासाठी योग्य असा मुहूर्त पाहावा लागतो.

तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या कालगणना करणारया पाच अंगांची रोजची माहिती ज्यात असते त्याला पंचांग असे म्हणतात.  जन्मकाळी पंचांगानुसार दुष्टयोग आल्यास त्यांचे वर्गीकरण दोन प्रकारात होते.  पहिल्या प्रकारातील दुष्टयोग हे बालक व त्याचे आई वडील ह्यांच्याशी तसेच तत्सम नातेवाईकांच्या आयुष्याशी निगडित असतात.  दुस-या प्रकारातील दुष्टयोग दारिद्र्य, कष्ट, मनस्ताप ह्यांच्याशी निगडित असतात.

हिंदू ज्योतिष शास्त्रानुसार जन्माच्या वेळी सामान्यपणे खालील योग असतील तर त्यासाठी ती जननशांती शास्त्रशुद्ध व विधींनुसार केली असता या संकटांची तीव्रता कमी होण्यास मदत होते.

तिथी शांती : सिनीवाली, कुहू, दर्श अमावास्या, कृष्ण चतुर्दशी, क्षयतिथिइ.     

  • सिनीवाली शांती - जन्मदिवशी जर सकाळी उजाडता कृष्ण चतुर्दशी व नंतर अमावास्या लागत असेल तर ही शांती करावी.
  • कुहू शांती - जन्मदिवशी जर सकाळी उजाडता अमावास्या व नंतर प्रतिपदा लागत असेल तर ही शांती करावी.
  • दर्श अमावास्या शांती - जन्मदिवशी संपूर्ण दिवस जर अमावास्या असेल तर ही शांती करावी.
  • कृष्ण चतुर्दशी शांती - जर जन्मवेळी कृष्ण चतुर्दशी तिथी असेल तर ही शांती करावी.
  • दिनक्षय शांती - कोणत्याही दिवशी जेव्हा एखादी तिथी सूर्योदयानंतर सुरु होत असेल व ती दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापूर्वीच संपत असेल तर त्या तिथीचा क्षय झाला असे समजतात. सबब या कालखंडात जर जन्म झाला असेल तर ही शांती करावी.

नक्षत्र शांती : अश्विनी, पुष्य, आश्लेषा, मघा, उत्तरफाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, व रेवती इ.

योग शांती : व्यतीपात, वैधृती, परीघ, गंड, अतिगंड, शूल, वज्र, व्याघात, इ.

करण शांती : विष्टी (भद्रा)

तिथिगंडांत व लग्नगंडांत शांती : अमावास्या-प्रतिपदा, पौर्णिमा-प्रतिपदा, पंचमी-षष्ठी व दशमी-एकादशी ह्यांच्या संधिकालाच्या २ घटी ( ४८ मिनिटे ) ह्यांना तिथिगंडांत म्हणतात. उदा : पंचमीची शेवटची घटी ( २४ मिनिटे ) व षष्ठीची पहिली घटी ( २४ मिनिटे ).

मीन-मेष, कर्क-सिंह, वृश्चिक-धनू ह्यांच्या लग्नसंधीच्या एका घटिकेला (२४ मिनिटेलग्नगंडांत म्हणतात.

वार-नक्षत्र-तिथीयोग शांती : वार, नक्षत्र व तिथीच्या विशिष्ट संयोगाने यमघंटयोग / मृत्युयोग / कालदंडयोग / दग्धयोग  होतो.

यमघंटयोग शांती

- रविवारी  मघा नक्षत्र असेल तर

- सोमवारी विशाखा नक्षत्र असेल तर

- मंगळवारी आर्द्रा नक्षत्र असेल तर

- बुधवारी मूळ नक्षत्र असेल तर

- गुरुवारी कृत्तिका नक्षत्र असेल तर

- शुक्रवारी रोहिणी नक्षत्र असेल तर

- शनिवारी हस्त नक्षत्र असेल तर

मृत्युयोग शांती

- रविवारी अनुराधा नक्षत्र असेल तर

- सोमवारी उत्तराषाढा नक्षत्र असेल तर

- मंगळवारी शततारका नक्षत्र असेल तर

- बुधवारी अश्विनी नक्षत्र असेल तर

- गुरुवारी मृग नक्षत्र असेल तर

- शुक्रवारी आश्लेषा नक्षत्र असेल तर

- शनिवारी हस्त नक्षत्र असेल तर

कालदंडयोग शांती

- रविवारी भरणी नक्षत्र असेल तर

- सोमवारी आर्द्रा नक्षत्र असेल तर

- मंगळवारी मघा नक्षत्र असेल तर

- बुधवारी चित्रा नक्षत्र असेल तर

- गुरुवारी ज्येष्ठा नक्षत्र असेल तर

- शुक्रवारी अभिजीत (उत्तराषाढा नक्षत्राचा ४ था चरण व श्रवण नक्षत्राचा पहिला १/१५ भाग) नक्षत्र असेल तर

- शनिवारी पूर्वाभाद्रपदा नक्षत्र असेल तर

दग्धयोग शांती

- रविवारी द्वादशी तिथी असेल तर

- सोमवारी एकादशी तिथी असेल तर

- मंगळवारी पंचमी तिथी असेल तर

- बुधवारी तृतीया तिथी असेल तर 

- गुरुवारी षष्ठी तिथी असेल तर 

- शुक्रवारी अष्टमी तिथी असेल तर

- शनिवारी नवमी तिथी असेल तर

ग्रहणयोग शांती

कोणत्याही पत्रिकेत जेव्हा गुरु, चंद्र किंवा सूर्य यापैकी कोणताही एक किंवा अनेक ग्रह राहू किंवा केतू यापैकी कोणत्याही एका ग्रहाबरोबर युतीमधे असेल तेव्हा "ग्रहणयोग" होतो.

तसेच, जेव्हा गुरु, चंद्र किंवा सूर्य यापैकी कोणताही एक ग्रह राहू (किंवा केतू) आणि उरलेल्यापैकी कोणताही एक किंवा अनेक ग्रह केतू (किंवा राहू) बरोबर युतीमधे असेल तेव्हा "दुहेरी ग्रहणयोग" होतो.

तसेच, जेव्हा गुरु, चंद्र किंवा सूर्य यापैकी कोणतेही दोन ग्रह फक्त राहू किंवा केतू बरोबर युतीमधे असतील तेव्हा सुद्धा "दुहेरी ग्रहणयोग" होतो.

ग्रहण जनन शांती : सूर्य ग्रहणात किंवा चंद्र ग्रहणात जन्म झाला असेल तर .

अन्य निमित्ते : यमल (जुळी संतती), एकनक्षत्र (भावंडांचे एकच नक्षत्र किंवा आई/वडील व मूल यांचे एकच नक्षत्र असल्यास), त्रिकप्रसव (तीन पुत्रांनंतर कन्याजन्म किंवा तीन कन्यांनंतर पुत्रजन्म), सदंत (दात असलेल्या बालकाचा जन्म), अधोमुखजन्म (पायाळू), षड्ग्रहादि (पत्रिकेतील एकाच स्थानात ६ ग्रहांची युती असेल तर), पौषेप्रसूति (पौष महिन्यात स्त्रीची पहिली प्रसूती झाली तर), विपरीतजनन (चमत्कारिक अवयव, अवयवन्यूनता व अवयवाधिक्य), इ.

इतर जननशांती -

कालसर्प शांती, विषनाडी शांती, विषकन्यायोग शांती, गोप्रसव शांती, इ.

संपर्क करा




सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ