Sanskrit On-Line Learning, E – Tution

ई - शिक्षण

संस्कृत ही सर्व भाषांची जननी मानली जाते.  या भाषेत वाचन साहित्याबरोबरच मुखोद्गत करण्यासाठी अनेक श्लोक, स्तोत्रे, सूक्ते व मंत्र आहेत.  परंतु अनेकदा अधिकारी व्यक्तीकडून ते ग्रहण न करता आल्यामुळे, म्हणताना अनेक चुका होतात.  चुकीच्या उच्चारणामुळे अपेक्षित ध्वनी निर्माण होत नाही व परिणामत: त्यापासून होणारे अपेक्षित लाभ व्यक्तीला मिळत नाहीत.

सर्वप्रथम म्हणावयास घेतलेले सूक्त / श्लोक व्याकरणदोष किंवा मुद्रण दोषाशिवाय उपलब्ध असायला हवा.  सर्व -हस्व व दीर्घ अक्षरांचे नीट उच्चारण व्हायला हवे.  जोडाक्षर, अनुस्वार, विसर्ग असलेल्या अक्षरांचे उच्चार काही विशिष्ट पद्धतीनेच झाले तर त्याचा अपेक्षित परिणाम साधता येतो.  हे झाले फक्त श्लोक व स्तोत्रांच्या बाबतीत.  वेदोक्त मंत्र म्हणताना अक्षरांच्या उच्चाराबरोबरच काही अक्षरांना दिलेले 'स्वर' विशिष्ट प्रकारे 'दाखवावयाचे' (म्हणायचे) असतात.  उदात्त अनुदात्त स्वर हे संबंधित अक्षराच्या खाली किंवा वर अनुक्रमे आडव्या किंवा उभ्या रेषेने दर्शवलेले असतात.

ध्वनिशास्त्र हे भाषाशास्त्रातील एक प्रमुख अंग आहे.  यात माणसाच्या बोलण्यातील (भाषणातील) आवाजाचा किंवा चिन्हांकित भाषेमधील विशिष्ट चिन्हांच्या पैलूंचा अभ्यास केला जातो.  उच्चारलेल्या शब्दांतून निर्माण झालेल्या ध्वनींचा स्वत:च्या शरीरावर तसेच तिथे उपस्थित असलेल्या दुस-याही व्यक्तीवर परिणाम होत असतो.  ध्वनी योग्य निर्माण झाला तर सुपरिणाम दिसतो अन्यथा दुष्परिणाम.

कोण्याही वेदोक्त मंत्राचे किंवा मंत्रसमूहाचे / सूक्ताचे शास्त्रोक्त उच्चारण केल्यानंतर त्याच्या निर्माण होणार-या ध्वनीतून अनेक लाभदायी परिणाम दिसून येतात.  चुकीचे उच्चारण करुन एखादा मंत्र अनेकदा म्हटला किंवा तो गायन स्वरूपात (उदा: गायन स्वरूपात म्हटलेला गायत्री मंत्र) अनेकदा ऐकला तरी तो विफल आहे.

फेसटाइम / स्काईप / च्या माध्यमातून खालीलपैकी कोणतेही विषय शिकता येतील ....

- गणपती अथर्वशीर्ष 
- शिवमहिम्न 
- रुद्राध्याय 
- पुरुषसूक्त 
- श्रीसूक्त 
- सौरसूक्त
- ब्रह्मणस्पतिसूक्त 
- विष्णुसूक्त 
- देवीसूक्त 
- मन्युसूक्त 
- हरिसूक्त 
- मेधासूक्त
- अन्नसूक्त 
- उदकशांती 
- शांतिपाठ 
- संस्कृत सप्तशती 

- भगवद्गीता 
- पूजाविधी 
- ऋग्वेद संहिता 

- तुम्हाला शिकावयाचा असलेला विषय 

संपर्क करा
सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ